Devendra Fadnavis saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? साम टीव्हीला सूत्रांची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या सरकारला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांच्यासहित त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे-सरकारला पाठिंबा दिला आहे.

अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्याच्या राजकारणात बदल झाल्यानंतर फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याची माहिती साम टीव्हीला मिळाली आहे.

अजित पवारांचा शिंदे सरकारला पाठिंबा

अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. अजित पवार यांच्या निर्णयामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आणि अमोल कोल्हे हे सर्वजण अजित पवार यांच्या सोबत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : नोटांचे स्क्रॅप भरून जाणाऱ्या ट्रकला आग; कांढळी ते बरबडी रस्त्यावरील घटना

Success Story: कधी-काळी एका खोलीत राहून काढले दिवस, आज आहेत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा काय आहे त्यांचा बिझनेस?

Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचा जतमध्ये भाजपला पाठिंबा!

Girish Mahajan : कोपरगावमध्ये काळे- कोल्हेंचा वाद मिटणार, लवकरच एकाच मंचावर दिसतील; मंत्री गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT