Devendra Fadnavis And Bhagat Singh Koshyari Saam TV
मुंबई/पुणे

...तर देवेंद्र फडणवीस राज्यासह देशासाठी योगदान देतील; राज्यपालांचे सूचक वक्तव्य

'अनिल कपूर यांच्या नायक सिनेमात अनिल कपूर नसते तर, भगतसिंग कोश्यारी यांना पुन्हा घेतलं असतं, ते नायकच आहेत.'

Jagdish Patil

सुशांत सावंत -

मुंबई: जेव्हापासून मी राज्यात आलोय, तेव्हापासून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देशासाठी आशेचे किरण आहेत. देवाची इच्छा असेल तर फडणवीस राज्यासोबतच देशासाठी येत्या काळात काही तरी योगदान देतील.

मला वाटतं फडणवीस यांनी देशाची सेवा करावी असं सूचक विधान राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज डॉ.तुषार कांती बॅनर्जी लिखीत ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचं प्रकाशन दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे झालं या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. (Bhagat Singh Koshyari: A Soul Dedicated to the Nation)

पाहा व्हिडीओ -

राज्यपालांनी (BhagSingh Koshyari) केलेल्या या वक्तव्यामुळे फडणवीस येत्या काळात केंद्रीय पातळीवरती काम करणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधी देखील अनेक वेळा फडणवीस यांना राज्यातील राजकारणामधून राष्ट्रीय राजकारणात घेऊन जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातचं आता खुद्द राज्यपालांनी फडणवीस हे देशासाठी आशेचा किरण असून, ते येत्या काळात देशासाठी काही योगदान देतील असं मला वाटतं आहे,' असं म्हटल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, फडणवीसांनी देखील या कार्यक्रमात राज्यपालांवर कौतुकाचा वर्षाव केला, कधी कधी वाटत ते राज्यपाल हे नायकच आहेत. अनिल कपूर यांच्या नायक सिनेमात अनिल कपूर नसते तर, भगतसिंग कोश्यारी यांना पुन्हा घेतलं असतं, ते नायकच आहेत. आपल्या पूर्ण जीवनात ज्या व्यक्तींनी फक्त समाज आणि राष्ट्राचा विचार केला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते जोडले गेले, देशसेवा करत त्यांनी प्रत्येक जबाबदारी निभावली.

अशी खूप कमी व्यक्ती आहेत ज्यांनी चारही संसद पाहिल्या आहेत. कोश्यारी जिथे जातात तिथे लोकांना जवळ करतात आणि आपलेसे वाटतात. राज्यपाल इकडे ३ वर्षांपूर्वी आले, त्यामधील २ वर्षे कोरोनात गेली, सर्व त्यांना सांगायचे बाहेर पडू नका, एक वेळ अशी होती सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्री देखील कुठे जात नव्हते पण राज्यपाल मात्र सगळीकडे जायचे. असं म्हणत फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

शिवाय राजभवनला देखील असे राज्यपाल पहिल्यांदाच मिळाले असतील, जे सकाळी ४ वाजता उठतात अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी राज्यपालांचे कौतूक केलं. ते पुढे म्हणाले, भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनला लोकभवन केलं, भगतसिंग कोशयारी यांच्यावर पुस्तक लिहायचे झालं तर पाच ते सहा आवृत्ती काढाव्या लागतील.

आणखी पुस्तके निघाली तर अनेक अनुभव निघतील, त्यांनी भरपूर कमी वेळात मराठी शिकली. मी आधीच्या राज्यपालाचे आभार मानतो कारण त्यांनी हा बंगला बनवला जर हे असते तर यांनी झोपडी बनवली असती आणि आम्हाला देखील घेऊन गेले असते. आम्ही डोंगर इकडे आणू पण तुम्हला जाऊ देणार नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT