Amrita Fadnavis Latest Photoshoot Saam TV
मुंबई/पुणे

Amrita Fadnavis News: हातात साप, खांद्यावर सरडा, अमृता फडणवीसांनी शेअर केले फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Amrita Fadnavis Latest Photoshoot: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे.

साम टिव्ही ब्युरो

Amrita Fadnavis Latest Photoshoot: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. अमृता यांना गाण्याची देखील प्रचंड आवड आहे. त्या नेहमी आपले फोटो शेअर करत असतात. दरम्यान,आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस प्रकाशझोतात आल्या आहेत.

याच कारण म्हणजे त्यांनी साप आणि सरडा या दोन प्राण्यांसोबत फोटोशूट केलं आहे. त्यांच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर (Social Media) वादळ उठलं असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अमृता यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटरून दोन फोटो शेअर केले आहेत.

यातील पहिल्या फोटोत अमृता यांनी आपल्या दोन्ही हातात साप धरलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्यांनी हातावर सरडा ठेवलेला दिसून येत आहे. या फोटोंना अमृता यांनी भन्नाट कॅप्शन सुद्धा दिलं आहे. 'सर्वात धोकादायक, विषारी आणि भयानक प्राणी फक्त मानव आहेत!' असं अमृता यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral News) होत आहे. नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहे. एका नेटकऱ्याने या फोटोंचा संबंध थेट राजकारणासोबत जोडला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत हेच दिसत आहे, असं त्याने म्हटलं आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफार्मवर सक्रीय असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील लाखांमध्ये आहे. अनेक घटना, घडामोडी, सण आदींवर त्या व्यक्त होत असतात. माध्यमांमध्ये त्यांच्या अनेक पोस्टची दखल घेतली जाते. काही दिवसांपूर्वी एका 'सीए'ने त्यांच्या फोटोंवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून मिटकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला; शिरसाटांनाही सुनावलं

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT