devandra fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: "उद्या दिवसभर घरी, 'ते' केव्हाही येऊ शकतात", फडणवीसांचं ट्विट

बीकेसीतील सायबर पोलिसांत सकाळी 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी फडणवीसांना बोलावण्यात आलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: बदली पोस्टिंग प्रकरणी बीकेसी सायबर पोलिसांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली होती. याप्रकरणी त्यांना उद्या (13 मार्च) बीकेसीतील सायबर पोलिसांत सकाळी 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, गृहमंत्रालयात याबाबत झालेल्या चर्चेनंतर पोलीसच फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे. फडणवीसांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिलीये (Devendra Fadnavis Tweet Says There Is No Need To Go To Police Station Instead Police Come To His Residence).

मी माझे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द, ते केव्हाही येऊ शकतात, फडणवीसांचं ट्विट

"सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ.मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.जयहिंद, जय महाराष्ट्र !", असं ट्विट फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलं आहे.

भाजपची आक्रमक भूमिका, सरकार बॅकफूटवर

भाजपच्या (BJP) आक्रमक भूमिकेने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govt) बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. बीकेसी येथील सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना रश्मी शुक्ला प्रकरणी नोटीस पाठवली होती. तसेच, त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, भाजप बीकेसी पोलीस ठाण्यापुढे शक्ती प्रदर्शन करणार असल्याच कळताच सरकारने आता यु-टर्न घेतल्याचं दिसतंय. आता फडणवीसांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही, तर पोलीसच त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत.

रश्मी शुक्ला प्रकरणी दोन एफआयआर दाखल झाल्या होत्या. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची सीबीआयने सहा तास चौकशी केली आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये विरोधी पक्ष नेते फडणवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली. पण, अवघ्या काही तासात सरकारने यु-टर्न घेतला आणि आथा फडणवीस यांच्या घरीच पोलीस जाणार असल्याची माहितीये. त्यामुळे फडणवीसांना पोलीस स्थानकात जाऊन जबाब नोंदवण्याची गरज नाही. यातून सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. गृहमंत्रालयात याबाबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

फडणवीसांना नोटीस

बदली घोटाळ्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बीकेसी सायबर पोलिसांनी (Cyber Police) नोटीस पाठवली होती. तसेच, त्यांना उद्या रविवारी (13 मार्च) बीकेसी येथील सायबर पोलिसांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याबाबत आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. तसेच, मी चौकशीसाठी जाणार असल्याचंही ते म्हणाले होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यात कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी? जाणून घ्या एका क्लिकवर

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT