Devendra Fadnavis: फडणवीसांना नोटीस, भाजपची आक्रमक भूमिका, महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर

भाजप बीकेसी पोलीस ठाण्यापुढे शक्ती प्रदर्शन करणार असल्याच कळताच सरकारने आता यु-टर्न घेतल्याचं दिसतंय.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: भाजपच्या आक्रमक भूमिकेने महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. बीकेसी येथील सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना रश्मी शुक्ला प्रकरणी नोटीस पाठवली होती. तसेच, त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, भाजप बीकेसी पोलीस ठाण्यापुढे शक्ती प्रदर्शन करणार असल्याच कळताच सरकारने आता यु-टर्न घेतल्याचं दिसतंय. आता फडणवीसांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही, तर पोलीसच त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत (Mahavikas Aghadi On Back Foot BKC Cyber Police Go To Devendra Fadnavis House To Take His Statement).

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: गृहखात्याने निर्णय बदलला, आता पोलीसच फडणवीसांच्या घरी जाऊन जबाब नोंदवणार

सरकारचं यु-टर्न

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) प्रकरणी दोन एफआयआर दाखल झाल्या होत्या. मुंबई पोलीस आयुक्तांची सीबीआयने (CBI) सहा तास चौकशी केली आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये विरोधी पक्ष नेते फडणवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली. पण, अवघ्या काही तासात सरकारने यु-टर्न घेतला आणि आता फडणवीस यांच्या घरीच पोलीस जाणार असल्याची माहितीये. त्यामुळे फडणवीसांना (Devendra Fadnavis) पोलीस स्थानकात जाऊन जबाब नोंदवण्याची गरज नाही.यातून सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. गृहमंत्रालयात याबाबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत

देवेंद्र फडणवीस उद्या बीकेसी येथील सायबर पोलिसांत जाऊन जबाब नोंदवणार होते. हे कळताच भाजपने (BJP) त्यांच्या समर्थ उतरण्याची तयारी केली होती. भाजपकडून बीकेसी सायबर पोलीस ठाण्याबाहेर शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता होती. मात्र, बीकेसी सायबर पोलीस स्वत: फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत, अशी माहितीये.भाजपची आक्रमक भूमिका पाहता उद्या कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

फडणवीसांना सायबर पोलिसांची नोटीस

बदली घोटाळ्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बीकेसी सायबर पोलिसांनी (Cyber Police) नोटीस पाठवली होती. तसेच, त्यांना उद्या रविवारी (13 मार्च) बीकेसी येथील सायबर पोलिसांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याबाबत आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. तसेच, मी चौकशीसाठी जाणार असल्याचंही ते म्हणाले होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com