मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात उद्या भाजपकडून शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता होती. मात्र, आता बीकेसी सायबर पोलीसच फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे. भाजपची आक्रमक भूमिका पाहता उद्या कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. गृहखात्यात याबाबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहितीये. (BKC Police Decided To Go To Devendra Fadnavis House To Record His Statement).
बदली घोटाळ्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बीकेसी सायबर पोलिसांनी (Cyber Police) नोटीस पाठवली होती. तसेच, त्यांना उद्या रविवारी (13 मार्च) बीकेसी येथील सायबर पोलिसांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याबाबत आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. तसेच, मी चौकशीसाठी जाणार असल्याचंही ते म्हणाले होते.
त्यानंतर, भाजपने (BJP) मात्र आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. फडणवीसांच्या समर्थनात भाजपचे कार्यकर्ते बीकेसी पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणावर जमण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. उद्या मुंबईत (Mumbai) भाजपकडून पुन्हा एकदा जोरदार शक्तीप्रदर्शन होणार का, असा प्रश्न असतानाच आता बीकेसी सायबर पोलीस स्वत: फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत, अशी माहितीये.
त्यामुळे आता फडणवीसांना बीकेसी पोलीस स्थानकात जाण्याची गरज नाही. भाजपच्या आक्रमक भूमिकेपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेतलाय की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तसेच, भाजप आता यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.