मुंबई: बदली घोटाळ्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी सायबर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. त्याबाबत आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी सांगितलं की मी चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगितलं. तसेच, कारवाई न करणाऱ्या सरकारवर कारवाई करावी की घोटाळा बाहेर काढणाऱ्यांवर कारवाई करावी, असा प्रश्नही यावेळी फडणवीसांनी उपस्थित केला (Pune Police Notice To Devendra Fadnavis About Transfer scam Fadnavis Says No One Asked Me About My Sources).
फडणवीस काय म्हणाले?
आज 12 मार्च आहे. 12 मार्च ला मुंबईत बॉम्ब स्फोट झाला होता. तीन दशकं झाली तरी त्याचे पडसाद आणि घाव कायम आहेत. त्या बॉम्बस्फोटात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. बॉम्ब स्फोट करणाऱ्यांशी संबंध असलेले जेलमध्ये जाऊनही आजही मंत्रीपदावर कायम आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या होम डिपार्टमेंटचा घोटाळा मी बाहेर काढला होता. भारताचे होम सेक्रेटरी यांना मी याबाबतची माहिती सादर केली होती. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत हे देखील मी सांगितलं होतं. याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने या संदर्भातील चौकशी सीबीआयला (CBI) दिली आहे. अनिल देशमुख यांची चौकशी यात आहे. अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत, असंही ते म्हणाले.
जेव्हा ही चौकशी सीबीआय़कडे गेली, तेव्हा राज्यसरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी एफआयआर दाखल केला. अधिकृत माहिती लीक कशी झाली, याबाबतची ही तक्रार होती. मला एफआयआर संदर्भात पत्र पाठविण्यात आले होते, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
माझ्या माहितीचा स्रोत मला विचारला जाऊ शकत नाही - फडणवीस
माझी माहिती कुठून आली, याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. मला पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. न्यायालयात सांगितले की मी नोटीसचं उत्तर देत नाहीये. मला उद्या बीकेसीच्या सायबर कार्यालयात ११ वाजता बोलावण्यात आले आहे. माझ्या माहितीचा स्रोत मला विचारला जाऊ शकत नाही. तरीही मी स्वतः तेथे जाणार आहे. पोलीस जी काही चौकशी करतील त्याला योग्य उत्तर मी देणार आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.
सायबरच्या पोलिसांच्या चौकशीला अर्थ उरत नाही - फडणवीस
मी राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरीही मी चौकशीसाठी जाणार आहे. अपेक्षा इतकीच की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा, 6 महिने सरकार कडे हा अहवाल पडला होता, कोणी किती पैसे दिले कोणाला कुठली बदली झाली ही माहिती आहे, अशी सर्व माहिती त्यात असताना सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर झाली पाहिजे, हा प्रश्न आहे, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
घोटाळा बाहेर काढला त्यांना चौकशी साठी बोलावले जात आहे. न्यायालयाने ही चौकशीची जबाबाबरी सीबीआयकडे सोपवली आहे. सायबरच्या चौकशीला अर्थ उरत नाही. मी जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आहे त्याचे उत्तर सरकारला सुचत नाही. म्हणून मला नोटीस पाठवण्यात आली आहे. सीबीआय होम डिपार्टमेंटमधील घोटाळ्यांची चौकशी करणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.