Mahayuti Crisis  Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : सस्पेन्स कायम, एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार का? सत्तेस्थापनेच्या दाव्यानंतर फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Political News : महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्तेस्थापनचा दावा केला आहे. सत्तेस्थापनचा दावा केल्यानेनंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.

डॉ. माधव सावरगावे

मुंबई : विधानसभेच्या निकालाच्या ११ दिवसांनी महायुतीचा खातेवाटपाचा पेच सुटला आहे. निकालाच्या ११ दिवसांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीत महायुतीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर महायुतीचा उद्या ५ डिसेंबर रोजी शपथविधीचा सोहळा होणार आहे. या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात सामील होण्याची विनंती केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानतो. एकनाथ शिंदे यांनी मला मुख्यमंत्री करावा, असे पत्र राज्यपालांना दिले आहे. अजित पवार यांनीही त्याच आशयाचे पत्र देऊन मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी पत्र दिले आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत उद्या शपथविधी सोहळा पार पाडला जाणार आहे. या शपथविधीला तिन्ही पक्षाचे नेते असणार आहेत'.

'शपथविधी किती लोकांचा होईल, याची माहिती संध्याकाळी दिली जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत. मात्र आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतो. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ती सरकारद्वारे पूर्ण करू असा विश्वास व्यक्त करतो, असे फडणवीस पुढे म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर अजित पवार म्हणाले, 'मी माझ्या वेगळ्या कामाला दिल्लीला गेलो होतो. कुणाला भेटायला गेलो नव्हतो. माझी पत्नी राज्यसभेवर असल्याने सरकारी बंगला मिळाला आहे. त्या कामासाठी गेलो होतो. वकिलांना भेटलो. त्यांना भेटायला गेलो होतो. एका जवळच्या नातेवाईकांचे लग्न होते. या तीन कामासाठी दिल्लीत गेलो होतो. पहिल्यांदा ते डोक्यातून काढून टाका की, मी अमित शहा यांना भेटायला गेलो होतो.

'आम्हाला सरकारचा अनुभव असल्याने वेगवेगळ्या घटकांना आधार कसा देता येईल हे काम करू. आम्ही रुसवे फुगवे होऊ देणार नाहीत. आम्ही सरकारचे काम उत्तम करू. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. देशात महाराष्ट्राचा नाव लौकीक आहे, तो वाढवणार आहे, असे अजित पवार पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT