CM devendra Fadnavis on Yavat tension saam tv
मुंबई/पुणे

Yavat : दौंडच्या यवतमधील घटनेवर मुख्यमंत्र्यांचा कडक शब्दांत इशारा, दोन गटांतील तणावाचं कारणही सांगितलं

पुण्यातील दौंडमधील यवतमध्ये दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळं ही घटना घडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेकायदा कृत्य करणाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.

Nandkumar Joshi

पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये दोन गट भिडले. एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दोन गटांतील लोक परस्परांशी भिडले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. यवतमध्ये काही दुचाकी पेटवून देण्यात आल्या. तर घराचीही तोडफोड केली. या घटनेनंतर पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप केल्यानं तणाव निवळला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर त्यांनी बेकायदा कृत्य करणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मी आताच या संदर्भात माहिती घेतली. बाहेरच्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्टेटस ठेवल्याने हा तणाव निर्माण झाला. लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्यासाठी काही प्रमाणात लाठीमार करावा लागला.

परिस्थिती नियंत्रणात

यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसले आहेत. हा तणाव निवळण्याचा प्रयत्न आहे. जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे, अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना घडवताना पाहायला मिळतात. त्यांच्यावर कठोर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला.

सहन करणार नाही!

यवतमध्ये नुकतीच एक सभा झाली. त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याबाबतही मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिलीय का कुणाला? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने एखाद्या धर्मावर अशी टीका करण्याचा कुणाला अधिकार नाही. त्यामुळे सभेचा आणि या घटनेचा संबंध जोडण्याचे काहीही कारण नाही. सभा झाली म्हणून आम्ही असं केलं हे कुणी म्हणत असेल तर आम्ही सहन करणार नाही, अशी समजही त्यांनी यावेळी दिली.

चौकशी करणार

आता त्या ठिकाणी शांतता आहे. आता हे व्हिडिओ तिथले आहेत की बाहेरचे आहेत हे बघावं लागेल. अनेकदा पाहिलंय की बाहेरचे व्हिडिओ दाखवले जातात. या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुणालाही कायदा हातात घ्यायचा अधिकार नाही

यवतच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला शांततेचं आवाहन केले आहे. सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. कुणीही कायदा हातात घेऊ नका. कुणी बेकायदेशीर कृत्य करत असेल तर पोलीस कारवाई करतील. कुणालाही कायदा हातात घ्यायचा अधिकार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती

Crime News: शिवरस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवली पिस्तूल; चक्क पोलिसांसमोरच धमकावलं| व्हिडिओ व्हायरल

मध्य रेल्वेच्या आणखी एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; आता नवीन नाव काय?

Amla Murabba Recipe: थंडीत आवळा मुरंबा कसा बनवायचा?

Sakal Survey: महायुती सरकार ठरलं अव्वल! कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात पायाभूत सुविधांवर झालं सर्वाधिक काम?

SCROLL FOR NEXT