Devendra Fadnavis  Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर; म्हणाले, 'त्यांचे आरोप...'

Devendra Fadnavis on Manoj Jarange : या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी ते मराठा आरक्षणाविषयी भाष्य केलं.

Vishal Gangurde

सूरज मसूरकर, मुंबई

Devendra Fadnvis Latest News :

राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. तर राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट घेतली. या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

देवेंद्र फडवणीस म्हणाले, 'उद्यापासून राज्याचे अधिवेशन सुरु होत आहे. आता मंत्रिमंडळ बैठक झाली. अनेक निर्णय घेण्यात आले. आज विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पाहिली नाही. पण त्यांचं एक पत्र आले आहे. सध्या नेमक्या कोणत्या गोष्टीवर फोकस करावं हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे'.

'शेतकरी, अवकाळी, प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण आहे. विकासकाम होत आहेत. गुंतवणूक राज्यात येत आहे. मराठा समाज आरक्षणासाठी १० टक्केचा कायदा केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी जो शब्द दिला होता, तो पूर्ण झाला आहे, असेही फडणवीस म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'विरोधी पक्ष निराशेतून जात आहेत. रोज नवे विकास कामे होत आहेत. धानाला जो बोनस जाहीर केला होता, त्याचा निर्णय घेतला. अनेक निर्णय झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या संदर्भात सांगतील, असेही ते म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सागर बंगला सरकारी आहे. त्यामुळे सागर बंगल्यावर सरकारी कामासाठी कोणाचीही अडवणूक होणार नाही. ते कोणत्या निराशेतून बोलत आहेत. त्यांना कोणती सहानुभूती हवी आहे? मला माहीत नाही, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. धादांत खोटे आहेत. मराठा समाजासाठी सारथी सारख्या योजना सुरु केली. मराठा आरक्षण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं'.

'तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षण टिकवू शकले नाहीत. जी स्क्रिप्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलत होते, ती स्क्रिप्ट मनोज जरांगे यांनी का मांडावी? कायदा व सुव्यवस्था सांभाळून कोणीही आंदोलन केलं तरी हरकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आंदोलन केलं तर पोलिसांना योग्य कारवाई करावी लागेल, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर अजित पवार काय म्हणाले?

या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले,'मराठा आरक्षणाबद्दल सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शपथ घेतली. सर्व यंत्रणा कामाला लागली'.

अजित पवार पुढे म्हणाले, 'आपण काय बोलतोय कशा पद्धतीने बोलतोय. आपण कशा पद्धतीची शिवराळ भाषा वापरतोय. मी असं कधी बघितले नाही. राज्याचे प्रमुख दोन वेळा भेटायला गेले.राज्यातील

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहायला हवी. जाणीवपूर्वक वक्तव्य केली जात आहेत. अशी पद्धत कधी नव्हती. नियम सर्वांना सारखे आहे. सगेसोयरे याबद्दल साडे सहा लाख लोकांच्या हरकती आल्या आहेत. सर्वांनी याची नोंद घ्यावी. गालबोट लागेल असं कोणी करु नये'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT