Devendra Fadnavis reaction on Prakash Ambedkar Advice Uddhav Thackeray exit to maha vikas aghadi Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis News: प्रकाश आंबेडकर अधून मधून चांगला सल्ला देतात; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis on Prakash Ambedkar Advice: प्रकाश आंबेडकर हे अधून मधून चांगला सल्ला देतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Devendra Fadnavis on Prakash Ambedkar Uddhav Thackeray Advice: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते तयारी करत आहेत. त्यासाठी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांनी वज्रमुठ बांधली आहे. येत्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्रित जागा लढवणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिलाय.  (Breaking Marathi News)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकासआघाडीतून बाहेर पडावं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या सल्ल्यानंतर भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेतील नेते प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या सल्ल्यावर प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना, प्रकाश आंबेडकर हे अधून मधून चांगला सल्ला देतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. पुण्यात माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय फडणवीसांनी अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत सुद्धा भाष्य केलंय.

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीच शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. काळा पैसा शरद पवारांकडेच असून त्यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुद्धा केले होते. आता ते एकत्र येत आहेत चांगलं आहे. कारण त्यांनना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशातील आणि देशाबाहेरील शक्तीची लोकप्रियता लक्षात आली आहे. त्यामुळे त्यांना एकत्र यावं लागतं आहे, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला. (Maharashtra Political News)

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

उध्दव ठाकरे महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, तुमचा बळी जाईल. असा सुचक इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. आम्हाला घेतल्याशिवाय सत्तेत जाता येणार नाही. वंचितशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही. असा अप्रत्यक्ष टोला देखील आंबेडकरांनी लगावला होता. २४ मे रोजी भांडुपमध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सावध राहण्याचा सल्लाही दिला होता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT