Devendra Fadnavis on Param Bir Singh Suspension withdrawn
Devendra Fadnavis on Param Bir Singh Suspension withdrawn Saam TV
मुंबई/पुणे

Param Bir Singh Suspension: परमबीर सिंह यांचं निलंबन मागे का घेतलं? फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis on Param Bir Singh Suspension withdrawn: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेतलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

आज सरकारने हा निर्णय मागे घेत परमबीर सिंह यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, निलंबन मागे का घेतलं यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Breaking Marathi News)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

"परमबीर सिंह यांच्याबाबत कॅट'ने एक निर्णय दिला. ज्यात परमवीर सिंग यांची विभागीय चौकशी चुकीची ठरवत ती बंद करण्याचा निर्णय दिला. सोबतच त्यांचं जे निलंबित केलं होतं, ते सुद्धा मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने देखील निलंबनाचा निर्णय मागे घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केले होते गंभीर आरोप

अँटेलिया येथील स्फोटकांचं प्रकरण आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपामुळे परमबीर सिंह हे वादात सापडले होते. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून सिंह यांचं निलंबन केलं होतं. (Latest Marathi News)

मात्र, निलंबनानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी तेव्हा थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातच दंड थोपटले होते. सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक भलंमोठं पत्र लिहीत अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारासह वसुलीचे गंभीर आरोप केले होते.

या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. तसंच तुरुंगाची हवाही खायला लागली होती. इतकंच नाही तर, मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये परमबीर सिंह यांच्यावर खंडणीसह अन्य आरोपांखाली अनेक गुन्हे दाखल झाले होते. तसंच सिंह यांच्यावर पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी अनेक गंभीर आरोप केले होते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेरलं

Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

Kshitij Zarapkar : अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT