Devendra Fadnavis News Saam TV
मुंबई/पुणे

Kasba Peth Election Result : 'कसब्यातला विजय मविआचा नाही', फडणवीसांच्या विधानानंतर चर्चांना उधाण

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे.

Satish Daud

Devendra Fadnavis News : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार मतांनी पराभव केला. भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, तब्बल २८ वर्षांपासून ताब्यात असलेला कसब्याचा गड भाजपच्या हातातून गेला आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, कसब्यात भाजपच्या पराभवानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय महाविकासआघाडीचा नसल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच 'आम्ही पुन्हा येऊ' २०२४ मध्ये कसब्याची जागा आम्ही पुन्हा जिंकू, असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.

'कसब्यातील विजय महाविकासआघाडीचा नाही'

'कसब्यातला विजय महाविकासआघाडीचा नाही, कारण काँग्रेसच्या उमेदवाराने साधे राहुल गांधींचे फोटोही वापरले नाहीत. धंगेकर यांना नॅचरल सिम्पथी होती, आमच्या सर्व्हेमध्येही ती दिसत होती. पण ही सिम्पथी कमी होईल, असा आम्हाला विश्वास होता, पण ती शेवटपर्यंत राहिली, त्याच्यामुळे त्यांना हा विजय मिळाला आहे. कसाही मिळाला असला तरीही तो विजय आहे, त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो', असं फडणवीस म्हणाले. (Maharashtra Political News)

'आमच्या दोन्ही जागा निवडून येतील, असं अपेक्षित होतं. कसब्यामध्ये अतिशय चांगली मतं घेऊन देखील आम्ही विजयी होऊ शकलो नाही. जवळजवळ 45 टक्के मतं आम्हाला मिळाली आहेत, जी 2009 आणि 2014 पेक्षाही जास्त आहेत. हा पराभव शिंदे-फडणवीस यांचा आहे, असं म्हणायचं असेल तर पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्या नेत्यांचा पराभव आहे? तुम्ही प्रचारामध्ये शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनाही उतरवलं. त्यामुळे इथे आमचा पराभव म्हणत असतील तर तिकडे त्यांचा पराभव म्हणावं लागेल', असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

'अलीकडे एखादा विजय मिळाला की आनंद गगनात मावेनासा होतो, कारण त्यांची विजयाची सवय तुटलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकरता मोठा आनंद आहे. आम्हाला विजयाचा सराव आहे, पण पराभवातून आम्ही आत्मचिंतन करतो, त्यामुळे कसब्याचंही आत्मचिंतन करू. पराभवांच्या कारणांचं विश्लेषण करू', असंही फडणवीस म्हणाले.

'२०२४ मध्ये पुन्हा कसब्याची निवडणूक जिंकू'

"कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!," असे देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT