Sharad Pawar : संजय राऊतांच्या विधीमंडळाबाबतच्या वक्तव्यावर शरद पवार नाराज; पण...

संजय राऊत यांच्या वक्तव्याशी मी पूर्ण सहमत नाही.
MVA
MVASaam TV
Published On

>> भूषण शिंदे

मुंबई : महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये संजय राऊतांच्या विधीमंडळाबाबतच्या वक्तव्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांनी देखील संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काही अंशी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्याशी मी पूर्ण सहमत नाही. पण त्यावर हक्कभंगाची जी समिती नेमली गेली ती न्यायाला धरून नाही. ज्यांनी आरोप केले तेच या समितीत असतील तर न्याय कसा होईल, असं शरद पवारांनी हक्कभंग समितीच्या नेमणुकीबाबत बैठकीत म्हटलं.

MVA
Viral Video : 'जो पत्ता करतो गुल...', रविंद्र धंगेकरांच्या विजयी मिरवणुकीत परदेशी तरुणीचा बेभान डान्स

एकाधिकारशाही आज लोकांनी नाकारली आहे. विशिष्ट वर्ग आपल्या बाजूने आहे असे समजणाऱ्यांना आज कसबा पोटनिवडणुकीत लोकांनी दाखवून दिले की, आम्हाला गृहीत धरू नये. लोकांचे महविकास आघाडीवर प्रेम आहे, ते आज सिद्ध झाले, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

MVA
Kasba Byelection 2023: 'आम्ही पुन्हा येऊ'; कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट चर्चेत

चिंचवडच्या पराभवावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. कसबा आणि चिंचवड संदर्भात एकत्र लढल्यावर काय होतं हे आपल्याला दिसलं, बंडखोरी झाली की काय निकाल लागतो ते देखील स्पष्ट झालं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी काळजी घेण्यासंदर्भात देखील आज चर्चा झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com