सुशांत सावंत
मुंबई : राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने जोरदार चर्चा केली आहे. सर्व पक्षांकडून निवडणुकीसाठी तयारी सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेत (Shivsena) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील मतभेदाची चर्चा उघडपणे झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Maharashtra Politics News In Marathi )
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'कुणाच्या अंतर्गत वादावर मी बोलणार नाही. तिन्ही पक्षामध्ये मतभेद आहेत कुणाचाही कुणामध्ये मेळ नाही. आपला उमेदवार निवडून येईल यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. जो असंतोष आहे त्याला वाट मिळाली पाहिजे आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे.ही निवडणूक संभव आहे असंभव नाही'
दरम्यान, आज अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस त्यांच्या मुंबईतील घरी पोहोचले. मात्र, रवी राणा घरी नसल्याने पोलीस त्यांना अटक करू शकले नाही. या प्रकरणावर देखील देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निवडणुकीत देखील राज्य सरकार तसा प्रयत्न करू शकते'.
काँग्रेसचे वरीष्ठ नेते राहुल गांधी यांच्या एका ट्विटवर देखील प्रश्न विचारण्यात आला.त्यावेळी फडणवीस म्हणाले, राहुल गांधी खूप ट्विट करतात, त्यामुळे त्यांच्या ट्विटला महत्व देण्याची गरज नाही'. दरम्यान, नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. नाना पटोलेंवर टीका करताना फडणवीस म्हणाले,'नाना पटोले असे अधूनमधून गमतीदार बोलत असतात, आपण त्यांची मज्जा घ्यायची असते'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.