"आम्ही लढणारी माणसं, रडणारी नाही"- देवेंद्र फडणवीस SaamTV
मुंबई/पुणे

"आम्ही लढणारी माणसं, रडणारी नाही"- देवेंद्र फडणवीस

नितेश राणेंचं निलंबन करण्यासाठी हे सगळं ठरवून केले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंना बघून म्यॅव म्यॅव अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता या घटनेचे पडसाद हे सभागृहामध्ये उमटले आहेत. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये भास्कर जाधवांविरोधामध्ये एक विधान केले होते. त्यावरून आता हिवाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Assembly Winter Session) भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आक्रमक झाले आहेत. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले आहे. यावेळी नितेश राणेंचे निलंबन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हे देखील पहा-

सत्ताधाऱ्यांनी नितेश राणे हाय हाय अशा घोषणा सभागृहात देण्यात येत होते. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले बघायला मिळाले आहे. नितेश राणे यांना निलंबित केल्यास हा लोकशाहीचा (Democracy) खून होईल, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी म्हणाले आहेत. नितेश राणेंचं निलंबन करण्यासाठी हे सगळं ठरवून केलं जातं आहे.

या सभागृहामध्ये याआधी जाधवांनी भुजबळांचाही अपमान केला होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लावला आहे. 'आम्ही लढणारी माणसं आहोत, तुमच्या सारखी रडणारी नाही. राज्यामध्ये कायदा- सुव्यवस्था पाळला जात नाही. सभागृहामध्ये आमचा एक सदस्य निलंबित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांनी चुकीचे पायंडे पडू नयेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT