Devendra Fadnavis Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळचा विस्तार कधी होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

शिवसेनेच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेत (ShivSena) बंड केलेल्या आमदारांविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, कोर्टाने आताची परिस्थीती १ ऑगस्ट पर्यंत असीच राहुदे असे निर्देश दिले आहेत, यावरुन आता शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होणार का लांबणीवर पडणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रियी दिली आहे.

न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे काही मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज कोर्टात दोन्ही बाजंनी आपली बाजू मांडली आहे. १ तारखे पर्यंत आपले म्हणणे आणि कागदपत्रे द्यायची आहेत. जी काही सुनावणी आज झाली, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे निर्णय आमच्या बाजूने येईल. त्यामुळे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला नाही. लवकरच होणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

शिंदे गट भाजप एकत्र येत सत्ता स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात होते.

सुप्रीम कोर्टात काय झाले?

याचिकांवर आज सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाकडून वेळ वाढवून मागण्यात आला होता, आता पुढची सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. (Shivsena Latest News)

हरिश साळवे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) वेळ मागण्यात आली. कागदपत्रे सादर करण्यासाठी एक आठवड़्याचा वेळ असे सांगितले आहे. त्यावर सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

साळवे यांनी केलेल्या मागणीला कपील सिब्बल यांनी विरोध दर्शविला. कपील सिब्बल हे सध्या युक्तीवाद करीत आहे. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) सुध्दा याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. अल्पमतात असलेला नेता गटनेत्याचा काढू शकतो का असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. वेळ वाढवून देण्यात काही अडचण नसल्याचं दिसतंय. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी मागणी कपील सिब्बल यांनी केली. (Uddhav Thackeray Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT