Manoj Jarange Patil  Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis :...तर राजकारणातून निवृत्त होईल; मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना मी थांबवलं तर मी पदाचा राजीनामा देईन, असं म्हणत फडणवीसांनी जरांगे यांच्या आरोपांना उत्तर दिलं.

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना मी थांबवलं तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईल, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील यांचं माझ्या वर विशेष प्रेम आहे हे मला माहिती आहे. राज्याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारातून राज्यातील सर्व मंत्री काम करतात. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रितपणे काम करतो. जरांगेंना माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ आहे. त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारावं लागेल'.

'मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना मी थांबवलं तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईल. आतापर्यंत मराठा समाजासाठी मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले आहेत. मी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी राहिलो आहे. जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो अयोग्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

जरांगेंच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. आम्ही आरक्षण देताना तिघे एकत्र बसलो. प्रत्येक बैठकीत देवेंद्र फडणवीस होते. त्यांची मोलाची भूमिका होती. विरोधी पक्षाने विरोध केला. त्यांनी सहकार्य करायला हवंय. मराठा समजाला विरोध करत असून हे चुकीचं आहे'.

मनोज जरांगे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस आरक्षणात अडचण आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गणित चुकणार आहे, नाही चुकले तर माझं नाव फिरून ठेवा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

SCROLL FOR NEXT