Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis speech in thane : 'उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार, विचारांचे नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यातून टीकास्त्र सोडलं आहे. ते ठाण्यातील प्रचारसभेत बोलत होते.

Vishal Gangurde

विकास काटे, साम टीव्ही प्रतिनिधी

ठाणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्पा आहे. या पाचव्या टप्प्याची सांगता काही वेळात होणार आहे. पाचव्या टप्प्याची प्रचाराची सांगता होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. 'उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार, विचारांचे नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यातून टीकास्त्र सोडलं आहे. ते ठाण्यातील प्रचारसभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

पंतप्रधान मोदींनी काल देशाची पुढची दिशा काय असेल, हे सांगितलं.

महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतात. तसेत विकासाबद्दल बोलतात.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भाषणाची सुरुवात शिव्यांनी होते.

उद्धव ठाकरे यांना नकली बोललं की, मिरची झोंबली. तुमची वागणूकच तशी आहे.

त्यांना ही निवडणूक दिल्लीतील वाटत नाही, तर गल्लीतील निवडणूक वाटत आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही, तर नकली शिवसेना आहे.

उद्धव ठाकरे फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त संपत्तीचे वारसदार आहेत. विचारांचे नाही. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत.

शिवसेनेचा भगवा ध्वज त्यांना आता फडकं वाटू लागेल, कारण त्यांच्यावर हिरवं सावट आहे.

मोदींना निवडून देण्यासाठी जो कोणी काम करेल, तो भारताचा सैनिक असेल.

लोकांच्या मनातले मोदी हे मताच्या पेटीपर्यंत पोचवायचे आहेत.

ठाण्यात महायुती १४ पैकी १२ निवडून आली आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा हा आपला बालेकिल्ला आहे.

ही निवडणूक नगरसेवकांसाठी सराव आहे.

महायुतीचे कार्यकर्ते आणि घरच्यांचं मतदान आधी झालं पाहिजे.

उद्धव ठाकरे म्हणाले 48 जागा येतील, त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. ते 49 जागाही निवडून आणतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT