राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. येत्या २० मेला पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यात मुंबईतील ६ जागांचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत आज जाहीर पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
लवकरच जुमाला पर्व संपत आहे. येत्या ४ जूनपासून देशातील जनतेला अच्छे दिन येतील. कारण इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येतंय. असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलं आहे. भाजप सरकार महाराष्ट्राची लूट करीत आहेत. आम्ही महाराष्ट्राचं वैभव परत आणू, सध्या घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी पंतप्रधान येत आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्मंत्री यांना सोबत घेऊन हुकुमशहीचा प्रचार करत आहेत. ५० खोके आत्ता फुटले आहेत आणि त्याच आत्ता वाटप आत्ता सुरू आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला लगावला. जिथे मतदान कमी होणार तिथे लोकांच्या बोटांना आधीच शाई लावणं सुरू आहे. म्हणजे तिथे व्होटिंग करता येणार नाही, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.
केवळ निवडणूक जिंकण्यासाठी पुलवामाचा हल्ला घडवून आणला का? असा प्रश्न उपस्थित व्हायला जागा आहे. आत्ता आरएसएस नकली आरएसएस म्हणणं बाकी आहे.आगामी काळात भाजप आरएसएसवर बंदी आणणार, असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. आमचं सरकार आम्ही राम मंदिराच काम पूर्ण करू, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिलं.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजपवर घणाघाती टीका केली. भाजप धर्माचं राजकारण करून देशात राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय. राजकीय पक्ष फोडण्यासाठी तसेच नेत्यांवर दबाव आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जातोय, अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.