Devendra Fadnavis Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest Marathi News Saam TV
मुंबई/पुणे

काँग्रेसच्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची मनी डॉड्रिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसकडूनही आंदोलन सुरु आहे. काँग्रेसने राजभवन समोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रीया दिली. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले, काँग्रेसचे हे आंदोलन चुकीचे आहे, उच्च न्यायलयाच्या आदेशनंतर राहुल गांधी यांची ईडी चौकशी करत आहे. त्यामुळे अशा प्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी झाली पाहीजे, उच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहेत, हे चुकीचे आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रपती उमेदवारीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एनडीए जवळ पुरेशे संख्याबळ आहे, त्यामुळे एनडीए सांगेल ते उमेदवार राष्ट्रपती होती, असंही फडणवीस म्हणाले, अग्निपथ योजनेवर बोलताना फडमवीस म्हणाले, अग्निपत हे अॅडीशनल आहे, त्यामुळे रेग्युलर भरती बंद होणार नाही, काही जणांचा गैरसमज झाला आहे, पण त्यांच्या आता लक्षातक आल्यानंतर ते विरोध करणार नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपच्या (BJP) केंद्रीय मंडळाने लोकसभेच्या राज्यातील काही जागांवर लक्ष घातले आहे. त्या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजच्या बैठकीत या संबंधी चर्चा झाली. ज्या जागा आम्ही जिंकल्या आहेत त्यावर आमचे लक्ष आहे, नव्याने जिंकायच्या आहेत त्यावर आता आम्ही लक्ष देणार आहे. आम्ही यावेळी ४८ मतदार संघात तयारी करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: चेहऱ्यावर साबण लावताय?होऊ शकतात या गंभीर समस्या

Ananya Panday : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

400cc चे पॉवरफुल इंजिन, स्टाईश लूक; Bajaj Pulsar NS400 पुढील आठवड्यात होणार लॉन्च

Today's Marathi News Live: नरेंद्र मोदींनी 60 कोटी तरुणांना मुद्रा लोन दिलं; देवेंद्र फडणवीस

Madha Loksabha Election: देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक खेळी, धवलसिंह मोहिते पाटील यांचा महायुतीला पाठिंबा

SCROLL FOR NEXT