Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

काल आकांडतांडवाचा पूर्ण पर्दाफाश झाला आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज पहाटे राज्यसभा निवडणुकीचा(Election) निकाल समोर आला. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपने विजय मिळवला. भाजपचे (BJP) धनंजय महाडिक ४१ मतांनी विजयी झाले. भाजपच्या या विजयाने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. या विजयाचा जल्लोष आज मुंबई भाजपच्या कार्यालयात करण्यात आला. या जल्लोषा दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार टीका केली. या पराभवाचा महाविकास आघाडी सरकारने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने तीन उमेदवार उभे केले होते. महाविकास आघाडीने आम्हाला ऑफर दिली होती, पण त्यांना आम्हीही आमची बाजू सांगितली होती. राज्यसभा आमच्यासाठी महत्वाची आहे. पक्ष म्हणून आमच्याकडे मतं जास्त आहेत, पण त्यांनी ते मान्य केलं नाही. आमचे सहावे उमेदवार धनंजय महाडिक आता निवडून आले आहेत. विरोधकांनी काल मीडियावर दिवसभर आमच्यावर आरोप केले.

एकीकडे संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जेलमध्ये असूनही त्यांना मंत्री पदावर ठेवतात. काल आकांडतांडवाचा पूर्ण पर्दाफाश झाला आहे. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो, हे सरकार आंतरविरोधाने भरलेले सरकार आहे. शिवसेनेचे एक मत बाद झाले, ते मत बाद झाले नसते, आणि अनिल देशमुख(Anil Deshmukh), नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क मिळाला असता तरिही भाजपचा उमेदवार निवडून आला असता, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सरकारने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, सरकारच्या आमदारांमध्ये प्रचंड अंग्रेस्ट आहे. कारण ज्यावेळी सरकारचे काम थांबलेले असते तेव्हा लोकांचा राग आमदारांना फेस करावा लागतो, असंही फडणवीस म्हणाले.

२० तारखेला विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणूका (Election) सोप्या नाहीत. सरकारमधील आंतरविरोध आणि राग व्यक्त करण्याची जागा विरोधक देऊ शकतात, त्यामुळेच आम्ही विधान परिषदेसाठी उमेदवार दिलेले आहेत. या जागा आम्ही निवडून आणू असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांचे आभार मानले. या विजयाने आमच्यावरील आता जबाबदारी वाढली आहे, मोदींनी देशात ८ वर्षात जे काम केले आहे. ते महाराष्ट्रातील लोकांना हवे आहे, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

SCROLL FOR NEXT