संजय पवारांचा बळी संजय राऊतांनीच घेतला; नितेश राणेंचा आरोप

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.
Nitesh Rane, Sanjay Rane
Nitesh Rane, Sanjay RaneSaam Tv

मुंबई: राज्यसभेच्या ६ जागांसाठीचे मतदान काल (शुक्रवारी) पार पडले. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने (Rajya Sabha Election 2022) ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा (Election 2022) निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. भाजपने (BJP) मुसंडी मारत सहावा उमेदवार निवडून आणला. यावर आता शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. 'शिवसेनेचे कोल्हापुरचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव संजय राऊत यांच्यामुळेच झाला आहे', असा आरोप आमदार राणे यांनी केला.

Nitesh Rane, Sanjay Rane
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

आज पहाटे साडे चार वाजेला राज्यसभेचा निकाल समोर आला. भाजपकडून या विजयाचा जल्लोष मुंबईतील भाजपच्या कार्यालयात सुरू आहे. भाजपचे आमदार आणि सर्व नेते मुंबईतील कार्यालयासमोर जमले आहेत. यावेळी आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'शिवसेनेचे (Shivsena) कोल्हापूरचे आमदार संजय पवार यांचा बळी संजय राऊत यांनीच दिला आहे. त्यांच्यामुळेच पवार यांचा पराभव झाला आहे. फक्त एका मताने राऊत निवडून आळे आहेत. संजय राऊत यांनी आता माध्यमांसमोर येऊन बोलणे सोडून द्यावे, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

Nitesh Rane, Sanjay Rane
Rajya Sabha Election : आशिष शेलार-नितेश राणेंच्या रणनीतीमुळे शिवसेनेचे एक मत बाद

निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार म्हणाले की, मला स्वतःला निकालाने फार धक्का बसला असं नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर मविआच्या उमेदवारांना जो कोट दिला त्यात काही कमी पडला नाही. सहावी जागा जी शिवसेनेने लढवली त्यात मतांची संख्या अगोदरच कमी होती, भाजपची संख्या जास्त होती. तरीही आम्ही धाडस केलं पण त्यात अपयश आलं. अपक्षांची संख्या आमच्याकडे कमी होती. भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष आमदार होते त्या अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला आहे. बाकी महाविकास आघाडीच्या संख्येप्रमाणे मतदान झालं आहे त्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसं करणं त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com