BJP Saam TV
मुंबई/पुणे

OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; 27 टक्के तिकीट ओबीसींना देणार

ओबीसी मोर्च्याच्या बैठकीत फडणवीसंचा मविआवर हल्ला बोल...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राज्य सरकारनं (State Government) केलेला कायदा फेटाळत 15 दिवसांत निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. भाजपने तर ठाकरे सरकारनेच ओबीसीचा गळा घोटल्याचा आरोप केला आहे. आज भाजपने ओबीसी मोर्चाची बैठक (OBC Reservation) आयोजित केलीय..या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारमधील तीन पक्षातील मालकांनाच ओबीसींना आरक्षण द्यायची नसल्याची टीका केली आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपचा डीएनए ओबीसी आहे आणि याचमुळे आगामी निवडणुकामध्ये ओबीसीना 27 टक्के तिकीट देणार असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केल्यानंतर मविआचे नेते तरी कसे गप्प राहतील. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच पलटवार केलाय.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुरू झालेले हे राजकीय वादळ इतक्यात तरी शांत होईल असे दिसत नाही. पण आगामी निवडणूकित ओबीसी समाज कुणाच्या बाजूने उभा राहील हे निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. तूर्तास तरी निवडणूकांच्या तोंडावर यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप होतील यात मात्र शंका नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Risks: कोणत्या पदार्थांमध्ये मीठ वरून टाकून खाऊ नये?

एकच प्याला, पण तोही धोकादायक! मद्य प्राशन केल्यास गंभीर आजाराचा धोका, 31st पार्टीआधी डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Mumbai Infrastructure : कायापलट होणार! बदलापूर, कर्जत ते वसई आणि पनवेल; लोकलच्या १४ प्रोजेक्टसाठी १८३६४ कोटी मंजूर, वाचा

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT