Bjp Nandu Parab Facebook Viral Post News Saam Tv
मुंबई/पुणे

Nandu Parab : ...याचा संबंध भाजपशी, नंदू परब यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर राजकारणात वादळ

Bjp Nandu Parab Facebook Viral Post News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या सूचक फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महापौर निवडीपूर्वीच तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Alisha Khedekar

  • केडीएमसी निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग

  • भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची सूचक फेसबुक पोस्ट व्हायरल

  • पोस्टमागील अर्थावर राजकीय वर्तुळात चर्चा

  • महापौर खुर्चीसाठी पक्षांमध्ये चुरशीची लढत

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्यात नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकाल लागला असून अद्यापही कोणत्याही महापालिकेचा महापौर निश्चित झालेला नाही. या महापौर खुर्चीसाठी पक्षापक्षांमध्ये चुरशीची लढत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाला मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर राजकीय समीकरणे बदलताना दिसत असतानाच, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची एक फेसबुक पोस्ट सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे.

नंदू परब यांनी केलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये एक योद्धा धारातीर्थी पडलेला दिसत असून, त्याच्या पाठीत अनेक बाण रोवलेले असल्याचे चित्र आहे. या चित्रासोबत लिहिलेला मचकूरही सूचक असून, त्यातून थेट कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, कल्याण-डोंबिवलीच्या जनतेने याचा संबंध भाजपशी लावू नये,असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या पोस्टमधील योद्धा नेमका कोण? आणि त्याच्या पाठीत बाण मारणारे कोण? याबाबत कोणतेही स्पष्ट विधान नसले तरी, या प्रतीकात्मक पोस्टमागे नेमका राजकीय रोख काय, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विशेषतः शिंदे गटाला मनसेने दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर, ही पोस्ट त्याच घडामोडींशी संबंधित तर नाही ना, असा प्रश्न सामान्य जनतेला आणि राजकीय निरीक्षकांना पडला आहे. या फेसबुक पोस्टनंतर कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, सोशल मीडियावर विविध अर्थ काढले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

पुन्हा मोठा राजकीय भूकंप! एकवेळ भाजपसोबत जाऊ, पण शिंदेंसोबत नाही; राऊतांनी बॉम्ब फोडला

Marathi Movie: आग्रा स्वारीचे शौर्य पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा ट्रेलर थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

SCROLL FOR NEXT