Devendra fadnavis  Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : लाडकी बहीण योजनांमुळे महाराष्ट्राचं आर्थिक गणित बिघडलं का? CM फडणवीसांनी नेमक्या शब्दात सांगितलं

Devendra Fadnavis Latest News : लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राचं आर्थिक गणित बिघडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या सर्व राजकीय चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

राज्यात लोकप्रिय योजनांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेची राज्यात विशेष चर्चा आहे. या योजनेवरून सत्ताधाऱ्यांना टीकेचाही सामना करावा लागत आहे. राज्यातील कंत्राटदारांनीही १ लाख कोटींची देणी बाकी आहेत. कंत्राटदारांनी त्याविषयी विचारणा करत काम बंदचा इशारा दिला होता. या सर्व बाबींमुळे राज्यात आर्थिक गणित बिघडल्याची चर्चा होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ सन्मान सोहळ्यात राज्याचं आर्थिक गणित आणि लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,' हे गणित लाडकी बहीण योजनेमुळे बिघडलं नाही. थोडी बेशिस्ती झाली. आम्ही पूर्वी पीडब्लूडी बजेट तयार करायचो. समजा, पाच कोटींची इमारत बांधायची असेल तर त्यात दोन-अडीच वर्ष लागतात. यावर्षी समजा त्याला अडीच कोटी लागणार आहेत. मात्र, तुम्ही यात पाच कोटींची कामे घेऊ शकतात'.

'तुम्ही आगाऊ कामे घेऊ शकता. त्यामुळए एकास दोन , एकास तीन कामे घेण्याची पद्धत होती. गेल्या पाच वर्षांत एकास पाचची पद्धत झाली आहे. त्यामुळे लायबिलिटी (कर्ज) वाढली. राज्यापुढे ५० हजार कोटींची लायबिलिटी उभी राहिली आहे. त्यासाठी नियोजन केलं आहे. आम्ही कंत्राटदारांचे पैसे देऊ. आम्ही आर्थिक नियोजन आणत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

'लाडकी बहीण योजना आम्ही सुरु केली. या योजनेमुळे ४०-५० हजार कोटींचा भुर्दंड किंवा त्याचा भार आला आहे. यामुळे एकप्रकारचा ताण अर्थसंकल्पावर येणार आहे. आता योजना बंद केल्या जातील, अशा बातम्या सुरु आहेत. ज्या योजना सुरु आहेत. त्या पुढेही सुरु राहतील. खर्च वाढल्यानंतर त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर होतो. जीडीपीवरही परिणाम होतो, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

'आपली वाढ करण्यासाठी उलटी मोजणी करायला सांगितली. म्हणजे केंद्र सरकारकडून किती आर्थिक मदत मागता येईल का, हे बघू. सर्व पद्धतीचा वापर करू. आपली महसुली तूट वाढत असल्याने भांडवली खर्च कमी करायचा, या ट्रॅपमध्ये जायचं नाही. आम्ही काही झालं तरी भांडवली खर्च कमी होऊ देणार आहे. पुढील दोन ते तीन वर्ष ताण असणार आहे, ते आम्ही मॅनेज करू, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आता मोठं काही तरी घडणार? ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी

Digital Code: बारकोड आणि क्यूआर कोड यांच्यामध्ये काय फरक आहे?

Boiled Potato: शिळा उकडलेला बटाटा खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT