Manasvi Choudhary
सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चर्चेत आहे.
लाडक्या बहीण योजनेत दररोज नवनवीन अपडेट येत आहेत.
२०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत नवीन नियम लागू केले आहेत.
विधानसभा निवडणुकीआधी सर्व महिलांना कोणत्याही अटी शर्ती आणि पडताळणी विना लाभ देण्यात आला.
मात्र आता लाडकी बहिणींना १५०० रूपये मिळवण्याकरिता निकष पूर्ण करावे लागणार आहेत.
ज्या महिलांचे वय २१ ते ६५ आहे त्यांना लाडकी बहिणींचा लाभ घेता येणार आहे.
२.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेचा घेता येणार आहे.
चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडक्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.