devendra fadnavis & uddhav thackeray. politics saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: संजय राऊत भाजपावर बरसत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी घेतला ठाकरे सरकारचा समाचार

अधिवेशनावरुन विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेत.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : विराेधकांची आवश्यकता नसेल तर कशाला तुम्ही आम्हांला निमंत्रीत करता. आम्ही तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर गेल्या वेळेस झालेली चूक पुन्हा हाेणार नाही असे अध्यक्षांनी आम्हांला सांगितलं आहे. आज बीएसईमध्ये विदर्भ विराेधी चेहरा उघड झाला आहे. गत वेळेस नागपूरला अधिवेशन घेऊ असं सांगूनही सरकारनं मुंबईतच अधिवेशन घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचा खाेटा चेहरा उघड झाल्याचा आराेप विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. (maharashtra winter assembly latest marathi news)

तेथे सफाईचे काम देखील सुरु झालं नाही. अधिवेशन घ्यायचं नाही हे ठरलेले हाेते तर खाेटा आव कशासाठी आणता. आम्ही लक्ष ठेवून हाेताे. सगळं खाेट सांगताहेत हे लक्षात आल्यावर आम्ही अध्यक्षांना भेटलाे आणि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे असे ही फडणवीस (devendra fadnavis) यांनी नमूद केले.

विदर्भातील (vidharbha) जनतेचा विश्वासघात महाविकास आघाडीच्या (mva) सरकारनं केला आहे. त्याचा बीएसईच्या बैठकीत आम्ही निषेध नाेंदविला आहे. येत्या तीन मार्चपासून अधिवेशन सुरु हाेईल. मुंबईतच अधिवेशन हाेईल अशी शक्यता वाटते असेही फडणवीस यांनी नमूद केले. सध्या तरी सरकार म्हणत आहे आम्ही अधिवेशन पुर्ण वेळ चालवू. परंतु जाेपर्यंत चालत नाही ताेपर्यंत आम्हांला त्यांच्यावर विश्वास नाही असे फडवणीस यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

Elvish Yadav House Firing: धावत धावत आले अन् धाड धाड धाड झाडल्या दोन डझनभर गोळ्या, गोळीबाराचा CCTV व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT