रश्मी पुराणिक, मुंबई
मुंबई: सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे-तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आजच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांचा उल्लेख "मुलुंडचा दलाल" असा केला आहे. सोबतच त्यांनी किरीट सोमय्यांना आक्षेपार्ह शब्दांतही टीका केली आहे. (Sanjay Raut Mention of Kirit Somaiya as 'Mulund's Broker' by Sanjay Raut ...)
हे देखील पहा -
याचवेळी त्यांनी सोमय्यांनी दाखल केलेल्या मराठीविरोधी याचिकेवरही टीका केली. ज्यांनी मराठी भाषेविरुद्ध काम केलं त्याच सोमय्याला भाजपवाले फ्रंटमॅन म्हणून घोषित केलं हाच का भाजपचा मराठी बाणा असा सवाल उपस्थित करत भाजपला टोला हाणला. त्यासोबतच ते म्हणाले की, सरकार पाडण्यासाठी मला भाजपचे लोक भेटले होते. जर का महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला मदत केली नाही तर तुम्हाला तपास यंत्रणा टाईट करतील अशी धमकी मिळाल्याची माहिती राऊतांना दिली आहे. त्यासोबतच ईडीबाबत म्हणाले की, हे लोक आमच्या महाराष्ट्रातील आया-बहिणींच्या घरात घुसतात. हे बाहेरचे लोक येऊन आमच्या मराठी माणसाला त्रास देतात असंही राऊत म्हणाले.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.