Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस उपायुक्तांनी स्वतः बुजविले खड्डे

पिंपरी चिंचवड शहरातील रसत्यावर खड्ड्यांचा साम्राज्य तयार झाले आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील रसत्यावर खड्ड्यांचा साम्राज्य तयार झाले आहे. या खड्ड्यांच्या मोठा फटका पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस (Police) अधिकाऱ्यांना देखील बसत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे जवळ असलेल्या मुकाई पुला खालून पिंपरीचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे हे दररोज त्यांच्या घरापासून चिंचवडकडे ये-जा करतात. मात्र मुकाई चौक येथे रस्त्यावर पडलेला खड्ड्यांमुळे दर दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, आणि याचा फटका या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना बसतो.

हे लक्षात आल्यानंतर तेथील एक खड्डा पोलीस (Police) उपआयुक्तांनी बुजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथील एका रिक्षाचालकाने आपल्या वाहनातून जवळच असलेली खडी, डस्ट आणून त्यांना मदत केली. यावेळी काही वाहतूक पोलीस, वॉर्डन देखील तिथे उपस्थित होते. त्यांनी देखील वाहतूक पोलीस उप आयुक्तांना खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी मदत केली.

मात्र एकीकडे जेव्हा पोलीस स्वतः रस्त्यावर उतरुन वाहन चालकांची काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत समजली जाणारी पिंपरी चिंचवड महापालिका फक्त कागदावरच श्रीमंती दाखवते का? असा प्रश्न करदाते पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT