Ganeshotsav 2022 Rules: गणेश मंडळांना मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर; पाहा काय आहेत नियम

Rules of Ganeshotsav 2022 By BMC: या नियमावलीनुसार गणेश मंडळांना सर्व नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
Rules of Ganeshotsav 2022 By BMC
Rules of Ganeshotsav 2022 By BMCSaam TV
Published On

मुंबई: येत्या ३१ ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2022) मुंबई महापालिकेकडून (BMC) गणेश मंडळांना नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार गणेश मंडळांना सर्व नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. (Rules of Ganeshotsav 2022 By BMC)

हे देखील पाहा -

अवघ्या काही दिवसांवर बाप्पाचे आगमन होणार असून बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मंडप उभारताना ३० फुटांपर्यंत असावा. २५ फुटांपेक्षा उंच मंडप असल्यास मंडप बांधणीचा अहवाल पालिकेला सादर करणे गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असेल. मंडप परिसरातील रस्त्यांवर खड्डे आढळल्यास संबंधित मंडळाला प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले होते. मात्र यंदा कोरोनाचे संकट ओसरल्याने मुंबईत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे.

पीओपीच्या गणेशमुर्तींवर मर्यादेचे बंधन नसले तरी मंडपाच्या उंचीवर बंधन आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मंडप परिसरात पालिकेने तयार केलेल्या लोकोपयोगी भित्तीपत्रके, कापडी फलक प्रदर्शीत करता येईल. मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू साथीच्या आजारांचा धोका वाढला असून मंडप परिसर स्वच्छ ठेवणे ही मंडळाची जबाबदारी आहे. आवाजाची पातळी अधिक होणार नाही याची काळजी संबंधित मंडळाने घेणे गरजेचे आहे. मंडपासाठी परवानगी दिली त्या ठिकाणी अन्य कुठल्याही गोष्टी करण्यास सक्त मनाई असल्याचे त्यांनी सांगितले. मंडपाच्या अंतर्गत भागात कुठल्याही प्रकारचा स्टाॅल उभारता येणार नाही.

Rules of Ganeshotsav 2022 By BMC
Ganeshotsav 2022: चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी २ हजार ३१० ज्यादा बसेस सोडण्यात येणार

रेल्वे स्टेशन, बस स्थानक, रिक्षा व टॅक्सी थांबे या ठिकाणी पादचारी व वाहनधारकांची ये-जा होत असते. त्यामुळे या ठिकाणी मंडप उभारताना वाहने व पादचाऱ्यांसाठी जागा उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यंदा गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होईल व ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com