राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांना २० फेब्रुवारीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीनं मेलद्वारे दिली होती.
धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे नात्यानं दोघेही आते - मामा भाऊ आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याऱ्या धमकीचा ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीनं पाठवला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. मुंबईतल्या जवळपास ७-८ पोलीस ठाण्यात आणि इतर विभागात हा मेल पाठवण्यात आला होता. यानंतर पोलिसांकडून ई-मेल नेमका कुणी पाठवला होता? याचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता.
हा ई-मेल जेव्हा पोलिसांना मिळाला तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये होते. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले होते. आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना आरोपी बुलढाण्यात असल्याची माहिती मिळाली. मुंबई एटीएस आणि बुलढाणा पोलिसांनी देऊळगावमधून कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे असं या आरोपींचे नाव आहे. हे दोघेही ट्रक चालक असून, त्यांनी अभय शिंगणे याच्या मोबाईलच्या दुकानातून धमकीचा ई-मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने आते -मामे भाऊ आहेत. मुंबई पुणे शाखेची टीम या दोन्ही तरुणांना मुंबईत घेऊन येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.