Jay Pawar Engagement Saam Tv
मुंबई/पुणे

Jay Pawar Engagement: उपमुख्यमंत्र्यांच्या घरी लगीनघाई! जय पवारांचा साखरपुडा संपन्न; आत्या सुप्रिया सुळेंनी शेअर केले फोटो

Jay Pawar Rutuja Patil Engagement: अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा काल साखरपुडा झाला. ऋतुजा पाटील यांच्याशी ते लग्नगाठ बांधणार आहे. या साखरपुड्याला शरद पवार, सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली होती.

Siddhi Hande

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Son) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar Engagement) यांचा साखरपुडा काल झाला. अजित पवारांच्या पुण्याच्या फार्महाउसला हा शाही साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब, काही ठरावीक मित्रमंडळी उपस्थित होते. या साखरपुडा सोहळ्याला विद्युत रोशनाई, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पुण्यातील घोटावडे या ठिकाणी अजित पवारांच्या फार्महाउस येथे हा सोहळा आयोजित केले होता. या सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. याचे फोटो सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुप्रिया सुळेंनी केले फोटो शेअर (Supriya Sule Share Photo Of Jay Pawar Engagement)

जय पवारांच्या आत्या सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. नवीन जोडप्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया ताईंनी जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्न ऋतुजा यांचा फोटो शेअर केला आहे. यानंतर एका फोटोत त्यांचे संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित असल्याचे दिसत आहे. त्यांनी कुटुंबासोबतचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यावर फोटोवर त्यांनी कॅप्शनदेखील दिले आहे. जयसाठी खूप खुश आहे.ऋतुजा तुझे कुटुंबामध्ये स्वागत. दोघांना खुप शुभेच्छा असं त्यांनी म्हटलं आहे.

साखरपुड्याआधी घेतले शरद पवारांची आशीर्वाद (Sharad Pawar)

जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा (Jay Pawar-Rutuja Patil Engagement)पार पडला. यावेळी त्यांनी आजोबा शरद पवारांचे आशीर्वाद घेतले.याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. .याचसोबत संपूर्ण पवार कुटुंबाचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्नामुळे अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT