Ajit Pawar On Chandrayaan 3 Landing Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar On Chandrayaan 3 Landing: ‘चांद्रयान-3’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात राहील, उपमुख्यमंत्र्यांनी केलं सर्वांचं कौतुक

Chandrayaan 3 Successful Landing: ‘चांद्रयान-3’च्या मोहिमेत राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली.

Priya More

Chandrayaan 3 News: ‘चांद्रयान-3’नं (Chandrayaan 3) चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Cm Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत या मोहिमेत मेहनत घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

‘चांद्रयान-3’च्या मोहिमेत राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली. समस्त देशवासियांच्या एकजुटीतून मिळालेलं हे यश असल्याचे सांगत ‘चांद्रयान-3’ मोहिमेत योगदान दिलेल्या इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशवासीयांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात देश यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

‘चांद्रयान-3’ची मोहिम यशस्वी झाल्याबद्दल अजित पवार यांनी आनंद व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, भारत गेल्या अनेक दशकांपासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आजच्या चांद्रमोहिमेच्या यशाने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं ही मोहिम राबवण्यात आली. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्रानंही आपलं योगदान दिलं.

तसंच, 'मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टना कोटींग करण्यात आलं. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर, तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलडाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जून्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली ५० वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचंही मोठं योगदान असून तेही कायम लक्षात ठेवलं जाईल.', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT