Devendra Fadnavis saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis News: संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलंय.

Bharat Jadhav

Devendra Fadnavis :

राज्य सरकारच्या नाड्या दिल्लीच्या हाती असल्याची टीका संजय राऊत यांनी सकाळी केली होती. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार उत्तर देण्यात आलं. उपमुख्यमंत्री फडवणीसांनी त्यावर भाष्य न करता ते उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत, असा टोला लगावला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधाला. (Latest News)

नांदेड आणि राज्यातील इतर शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनांवरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही टीका केली होती. राज्यातील शासकीय रुग्णालयांत गेल्या तीन दिवसांत शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला. पण सरकार कुठे आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे आहेत? तर शिंदे दिल्लीला जाऊन बसले आहेत. ते कधी गृहमंत्री अमित शहांना भेटायला जातात तर कधी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात बसलेले दिसतात.

एकनाथ शिंदेंना बोलावले तर ते मध्यरात्रीही दिल्लीला जातात. याचे कारण म्हणजे या सरकारचे नाडे दिल्लीच्या हातात आहे. त्यांना पाहिजे तेव्हा हे नाडे खेचले जातात, टाईट केले जातात. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वारंवार दिल्लीला पळावे लागते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

पुढे बोलताना त्यांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जेवढे नागरिक मारले गेले नसतील त्यापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू हलगर्जीपणामुळे सरकारी रुग्णालयांत होत आहेत. राज्य सरकार आपली ही जबाबदारी झटकू शकत नाही. संजय राऊत यांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. शिरसाट यांनी संजय राऊतांना शिवीगाळ केली. संजय राऊत ही राज्याला लागलेली कीड असल्याचं म्हटलं. संजय राऊतांच्या टीकेवर देवेंद्र फडणीस यांनीही उत्तर दिलंय.

आपण त्यांना भाव देत नसल्याचं भाव करत ते उत्तर देण्याच्या लायकीचे नसल्याची टीका देवेंद्र फडणीस यांनी केलीय. राज्यात मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्याबाबत चर्चा चालू असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिलीय. त्याचबरोबर फडणवीसांनी आमदार बच्चू कडु यांचं कौतुक केलं. अकोल्याचे तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने अकोला मध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT