Ajit Pawar Latest News saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का? राज्य सहकारी बँक घोटाळ्यात कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!

Maharashtra Co-Operative Bank Scam Latest News: एकीकडे सत्तेचं हे महानाट्य घडत असताना, दुसरीकडे विशेष पीएमएलए कोर्टाने राज्य सरकारी बँक घोटाळा प्रकरणात एक महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar Latest News: सध्या संपूर्ण राज्यभरात अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू असून अपात्रतेच्या नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, एकीकडे सत्तेचं हे महानाट्य घडत असताना, दुसरीकडे विशेष पीएमएलए कोर्टाने राज्य सरकारी बँक घोटाळा प्रकरणात एक महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांना या व्यवहारात फायदा झाल्याचं मत कोर्टाने नोंदवलं आहे. या कोर्टाच्या टिप्पणीमुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतच वृत्त दिलं आहे.

ईडीचा आरोप काय?

जरंडेश्वर साखर कारखान्याची अत्यंत कमी किंमतीत खरेदी झाल्याचा आरोप ईडीकडून (ED) करण्यात आला होता. याचा फायदा थेट अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना झाल्याचा दावाही ईडीकडून करण्यात आला होता. यासाठी पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून तब्बल ८२६ कोटींचं कर्ज या व्यवहारासाठी देण्यात आल्याचं ईडीने म्हटलं होतं.

ईडीनं राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी एप्रिल महिन्यात आरोपपत्र सुद्धा दाखल केलं होतं. खुद्द अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर या घोटाळ्यात थेट फायदा लाटल्याचा आरोप केला जात होता. मात्र, ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात अजित पवारांच्या नावाचा उल्लेखच करण्यात न आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मात्र, आता अजित पवारांच्या निकटवर्तीयांना या व्यवहारात फायदा झाल्याची बाब न्यायालयानंच (Court) नमूद केलं आहे. या व्यवहारात अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना फायदा झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याची टिप्पणी बुधवारी विशेष न्यायालयाने केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तींयांनी अत्यल्प दरात एका सहकारी साखर कारखान्याची खरेदी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असं मत कोर्टाने यावेळी नमूद केलं आहे. या कोर्टाच्या टिप्पणीमुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

कोर्टाकडून दोन्ही कंपन्यांना समन्स

दरम्यान, ईडीने या प्रकरणात आपल्या चार्जशीटमध्ये गुरु कमॉडिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह सीए योगेश बागरेंवर आरोप केले आहेत. कोर्टाने या आरोपपत्राची दखल घेत बुधवारी दोन्ही कंपन्या आणि बागरेचा यांना समन्स बजावलं आहे. येत्या १९ जुलै रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT