अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी महात्माजींविरोधात ओकली गरळ Saam Tv
मुंबई/पुणे

अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी महात्माजींविरोधात ओकली गरळ

शिवतांडव स्तोत्रामुळे चर्चेत आलेले अकोल्याचे कालीचरण महाराजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अपशब्द वापरले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : काही दिवसाअगोदर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक तरुण साधू ‘शिवतांडव स्तोत्र’ गात होता. तरुण साधूचा आवाज, त्याची स्टाईल बघून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जगभरात या व्हिडीओवर उड्या पडले होते. अनेकांना वाटले होते की हा साधू वाराणसी, किंवा कोणत्यातरी उत्तरेतील राज्यातला आहे. पण शोध घेतला असता हा तरुण साधू विदर्भातील अकोल्याचा असल्याचे सिद्ध झाले आहे.

पहा व्हिडिओ-

या तरुण साधूचे नाव आहे कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj). आता हेच महाराज परत एकदा चर्चेमध्ये आले आहेत. पण निमित्त एखाद्या स्तोत्राचे नाही तर शिवीगाळ केल्याने, बरं ही शिवीगाळ त्यांनी एखाद्या भक्ताला किंवा सहकाऱ्याला केली नाही तर ती राष्ट्रपिता महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) केले आहे. तेही जगजाहीर व्यासपीठावरुन धर्मसंसदेत बोले आहेत. कालीचरण महाराजांनी जे शब्द महात्मा गांधींबद्दल वापरले आहेत. ते तर देशाच्या शत्रुबद्दल देखील सुसंस्कृत माणसं वापरणार नाहीत.

मोहनदास करमचंद गांधी (Mohandas Karamchand Gandhi) हे तर राष्ट्रपिता. महात्मा. अशी त्यांची जगभरामध्ये देशाची ओळख आहे आणि झाली ती याच महात्म्याच्या कृतीने झाली आहे. त्याच महात्मा गांधींना अकोल्याच्या (Akola) कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोलीच वाहिली आहे. त्यातले काही शब्द तर इथे लिहिलेही जाऊ शकत नाही. त्याकरिता तुम्ही ट्विटमधला (tweet) व्हिडीओ बघावा. याच व्हिडीओमध्ये (video) कालीचरण महाराजाने गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचे अभिनंदन करण्यात आले आहे.

देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूरमध्ये (Raipur) जी धर्मसंसद पार पडली, त्यामध्ये देखील कालीचरण महाराजाने हे तारे तोडले आहेत. काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराज विरोधामध्ये देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली जात आहे. एकदा लोक तुम्हाला ऐकायला लागलेत म्हटल्यावर माणसांना काहींना काही बोलून चर्चेमध्ये रहायची सवय पडली आहे.

तसेच काही कालीचरण महाराजाबरोबर घडल्याचे दिसून येत आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीला कालीचरण महाराज एका कार्यक्रमाकरिता सांगलीत गेले. तेथे ते पत्रकारांना भेटले. ते म्हणाले कोरोना हा मोठा फर्जीवाडा आहे. सध्या काही जण लोकांना मारुन फेकत आहेत, ह्यांना डॉक्टरच मारत आहेत आणि त्यांच्या किडनी, मानवी अवयवांची तस्करी केली जात आहे. पुढचे ७० ते ८० वर्ष मजा करुन घ्या, त्यानंतर हे लोक १२ हजर वर्षे नरकात सडणार आहेत. हे होते कालीचरण महाराजांचे शब्द आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT