नाशिक : मागील काही काळापासून महाराष्ट्राबरोबरच देशात भ्रष्टाचार आणि करचोरीची अनेक घटना समोर येत आहेत. आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईमध्ये अनेक मोठे मासे हाती लागले आहेत. उत्तर प्रदेशामध्ये एका अत्तर व्यावसायिकाकडे तब्बल २५७ कोटींचे घबाड सापडल्याची घटना ताजी असतानाच, आता महाराष्ट्रात देखील आयकर विभागाने छापेमारी करण्यास सुरवात केली आहे.
हे देखील पहा-
आयकर विभागाने (Income tax department) नाशिकसह धुळे (Dhule) आणि नंदुरबारमध्ये (Nandurbar) विविध ठिकाणी छापेमारी करण्यास सुरवात केली आहे. या छापेमारीमध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड आयटीच्या (IT) हाती लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या छाप्यामध्ये संबंधित ३ जिल्ह्यामधून (district) २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
यामध्ये ६ कोटींच्या रोकडसह ५ कोटींचे मौल्यवान दागिने (Jewelry) देखील जप्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) मागील ५ दिवसामध्ये आयकर विभागाने तब्बल ३१ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आयकर विभागाने २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत.
आयकर विभागाने छापेमारीमध्ये जप्त केलेले कोट्यवधींचे घबाड मोजण्यासाठी तब्बल १२ तास लागले आहेत. छाप्यामध्ये सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. छापेमारीमध्ये आढळलेली सर्व बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे. संशयित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.