Pimpri chinchwad saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Name Change: पिंपरी-चिंचवडचे नाव बदलण्याची मागणी, नवीन नावही आलं समोर

Pimpri Chinchwad Name Change Demand: भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून पिंपरी चिंचवडचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad News : औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगरनंतर आता पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलण्याची मागणी जोर धरु लागली आहे. भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून पिंपरी चिंचवडचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागात फ्लेक्स लावत भक्ती शक्ती प्रतिष्ठानने पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलून जिजाऊनगर करण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ही मागणी करण्यात आली. (Latest Marathi News)

पिंपरी चिंचवड शहरात जवळपास 100 हून अधिक ठिकाणी पिंपरी चिंचवडचं जिजाऊनगर हे नाव करण्याची मागणी करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे शहरात पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

Jijau nagar banner

बॅनर्सवर काय लिहिलं आहे?

इथल्या मातीत उमटली आहेत पाऊले त्यांची. इथल्या वाऱ्याने झेलले आहेत श्वास निःश्वास त्यांचे. इथल्या पाण्यात मिसळला आहे घाम त्यांच्या परिश्रमाचा. आता होऊ दे या आसमंतात जयजयकार त्या नावाचा.

आता पिंपरी-चिंचवडचे नामकरण जिजाऊनगर करुया, छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनी नामकरण करण्याची मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिरामण बारणे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

Raisins Health Benefits: मनुके आरोग्यासाठी फायदेशीर, पण 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत!

हिवाळ्याच्या दिवसांत मूड का खराब होतो? त्यामागील वैज्ञानिक कारण काय?

Grandson property rights: आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा जन्मसिद्ध हक्क नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Furniture Cleaning Tips: फर्निचर स्वच्छ कसा करायचा? 5 सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT