Eknath Shinde/ Shivsena Saam Tv
मुंबई/पुणे

उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी; दीपाली सय्यद यांचं ट्विट

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील ट्विट करत एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या विरोधात जात त्यांनी आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरलं आहे. दरम्यान शिंदे यांना किमान 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात असून या सर्व आमदारांसह शिंदे हे आसामची राजधानी गुवाहटी येथे गेले आहेत. शिंदे यांनी बंडखोरी केल्याचं समजताच राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झालेत. शिवसेनेशी गद्दारी करू नका असे आवाहन शिवसैनिक करताना दिसून येत आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील ट्विट करत एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे. (Deepali Sayyad Eknath Shinde Latest Marathi News)

"माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल". अशा स्वरुपाचं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सेनेत आपला मान राखला जात असून महाविकास आघाडी सरकारमध्ये मध्ये माझ्यासह शिवसेनेच्या आमदारांची घुसमट होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच यातून आता बाहेर पडावे. तर पुन्हा भाजपसह युती करावी. हवं तर मला मंत्रीपद देऊ नका, असं म्हटलं होतं.

इतकंच नाही तर, महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, भाजपसोबत युती करावी, तसंच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव देखील शिंदे यांनी शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धूडकावून लावला होता. दरम्यान आता दीपाली सय्यद यांनी याआधीही एक ट्वीट केलं होतं. ज्यात त्यांनी, माननीय एकनाथ शिंदे साहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मीडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही. असे म्हटलं होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Tourism : हिवाळ्यात करा किल्ल्यावर भटकंती, नाशिकमध्ये लपलंय ऐतिहासिक ठिकाण

Delhi Bomb Blast : पार्किंगमध्ये कार ३ तास, ६.२२ ला निघाली, यू-टर्न घेतला अन्.. राजधानीत नेमकं काय काय घडलं?

Actor Dharmendra Networth: अभिनेते धर्मेंद्र यांची संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Delhi car Blast Live updates : जम्मू काश्मीरमध्ये आमिर आणि उमर या दोन भावांना घेतलं ताब्यात, चौकशी सुरू

Dharmendra-Hema Malini: 'ड्रीम गर्ल'शी लग्न करण्यासाठी धर्म-नाव बदलले, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची हटके लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT