Devendra Fadnavis News Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी आणि आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी दुसरी अटक, सांताक्रुज पोलिसांची कारवाई

Mumbai News : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड | मुंबई

Mumbai News :

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जीवे मारण्याची धमकी आणि आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात दुसरी अटक करण्यात आली आहे. सांताक्रुझ पोलिसांनी साताऱ्याचा रहिवाशी किंचक नवले याला अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी गुरवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना देखील अटक झाली होती. (Latest Marathi News)

काय आहे नेमके प्रकरण?

एका मराठा आंदोलकाने 'गावरान विश्लेषक' यूट्युब चॅनलवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये या अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीसांबाबत एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. योगेश सावंत यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या चॅनेलवर कारवाई करण्याआधीच अगोदर योगेश सावंत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला होता. अक्षय यांच्या तक्रारीनंतर आधी नवी मुंबई परिसरातून योगेश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. योगेश सावंत सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT