Eknath Shinde On Nana Patole Saam Tv News
मुंबई/पुणे

Eknath Shinde : बाप तो बापही होता हैं! मोदींवर टीका करणाऱ्या नाना पटोंलेंना एकनाथ शिंदेंनी सुनावलं

Eknath Shinde On Nana Patole : 'नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना सभागृहाचे नियम माहिती आहेत. पण ते असं का वागले याची माहिती नाही. त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न पण केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती'.

Prashant Patil

मुंबई : 'फक्त आणि फक्त चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला, सभागृहातील राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला', असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 'मोदींवर टीका करून चर्चेत राहता येतं, त्यामुळे 'बाप तो बापही होता हैं', असा टोलाही शिंदेंनी नाना पटोले यांना लगावला. भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, 'नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना सभागृहाचे नियम माहिती आहेत. पण ते असं का वागले याची माहिती नाही. त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न पण केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे चर्चेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना दाखवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं असावं. त्यांचे नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन मोदींवर टीका करतात. तसंच नाना पटोले यांनी केलं. पण बाप तो बापही होता हैं', असं शिंदे यावेळी म्हणाले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले. काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 'अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही, नाना पटोलेंनी माफी मागितली पाहिजे', अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. यानंतर नाना पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत सरकारी नोकरीची संधी; मिळणार पगार १.२० लाख रुपये; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख खून प्रकरणाची १५वी सुनावणी आज होणार

Premature menopause: चाळीशी गाठण्याआधीच महिलांच्या शरीरात अनपेक्षित बदलाने वाढवली चिंता; अकाली रजोनिवृत्तीच्या समस्येत वाढ

Solapur Pune Expressway Closed : सीना नदीच्या प्रवाहात वाढ! सोलापूर- पुणे महामार्ग वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद | VIDEO

iPhone 16 Cancelled: Flipkart Big Billion Daysमध्ये स्कॅम? iPhone 16 ऑर्डर रद्दीमुळे फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजवर ग्राहकांचा संताप

SCROLL FOR NEXT