Ajit Pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Ganpati Festival 2023: गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

Ganpati Festival 2023: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Vishal Gangurde

रुपाली बडवे

Ajit Pawar News:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणरायांच्या आगमनाने घराघरात धनधान्याची समृद्धी येईल. समाजात आनंद, उत्साह, भक्ती, चैतन्याचं वातावरण निर्माण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचेही आवाहन अजित पवारांनी केले. (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, गणेशोत्सवाला सामाजिक एकतेची, समाजप्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली परंपरा लाभली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अधिक वृद्धिंगत करा. तसेच नागरिकांनी समाजातील सर्वांना सोबत ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. आपण सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. गणेशोत्सव त्याच पद्धतीने साजरा पाहिजे'.

'गणेशोत्सव साजरा करताना कुटुंबातील, नात्यातील, मित्रपरिवारातील, समाजातील सर्वांनी मतभेद, मनभेद विसरा एकत्र या. त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदात, भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, असे ते म्हणाले.

'महाराष्ट्रातील काही भागात पुरेसा पाऊस पडला नाही. राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे. यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांच्या जीवनात, सुख, समृद्धी, आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येवो. सर्वांच्या आकांक्षा पूर्ण होवोत, अशी प्रार्थना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगणरायांच्या चरणी केली.

मुख्यमंत्र्यांचा गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना आवाहन

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गणेशोत्सवानिमित्त नागिराकांना शांततेत उत्सवेत साजरा करण्याचं आवाहन केलं. 'सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्यातील मोठा उत्सव आहे. सर्व सण, उत्सव तोलामोलात, जल्लोषात, उत्साहात, गुण्यागोविंदाने, शांततेत, भक्तिभावाने मंगलमय वातावरणात साजरे करताना कोणताही गालबोट लागू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT