crime , daund police station, ncp saam tv
मुंबई/पुणे

Daund Police Station : पिस्तूलाच्या धाकात विवाहितेवर अत्याचार; राष्ट्रवादीच्या नेत्याचे कुटुंब अडचणीत

दाेघे सध्या दुस-या गुन्ह्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Daund Police Station : महिलेवर सातत्याने अत्याचार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (ncp) माजी गटनेत्याच्या मुलासह सहा जणांवर दौंड पोलिसांनी (daund police) गुन्हा दाखल केला आहे. पीडिला तिच्या नव-याला सोडचिठ्ठी दे आणि माझ्याशी विवाह कर अन्यथा संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचे तक्रार पीडितेने पोलिसांत केली आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वसीम बादशहा शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड) याच्या पत्नीने १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पीडित विवाहितेला वसीम व तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घर बोलावले होते. पीडितेला सरबत मधून गुंगीचे द्रव्य दिल्यानंतर बादशहा आदम शेख व त्याच्या कुटुंबीयांनी बळजबरीने वसीम व तिचा मुस्लिम पध्दतीने विवाह (marriage) लावून दिला.

त्यानंतर वसीम याने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेकडे वसीम शेख याने नव-याला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली. माझ्याशी रितसर निकाह न केल्यास संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली.

वसीम याला एका प्रकरणात अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने अत्याचार प्रकरणी दौंड पोलिसांत धाव घेतली. तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत तक्रार दिली. त्यानंतर फिर्यादीनुसार वसीम शेख, बादशहा आदम शेख, माजी नगरसेविका रेहाना बादशहा शेख व त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य असे एकूण सहा जणांविरूध्द पाेलिसांना (police) गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान गुन्हा दाखल झालेले दौंड पालिकेतील राष्ट्रवादीचे माजी गटनेता बादशहा शेख, मुलगा वसीम हे दाेन्ही संशयित आरोपी एका विनयभंग, प्राणघातक हल्ला व एट्रोसिटी प्रकरणात सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती

Winter Season: हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Rinku Rajguru: आर्चीला पाहून म्हणाल सैराट झालं जी...

Rahul Gandhi: राहुल गांधी हाजीर हो! पुणे न्यायालयाने बजावला समन्स, २ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

Dog Life: कुत्रा किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT