Dattatray Gade Arrested 
मुंबई/पुणे

Dattatray Gade Arrested : दत्ता गाडेच्या अटकेचा थरार, मध्यरात्री घेतलं ताब्यात, नेमकं काय काय घडलं?

Pune Swargate Shiv Shahi Case : पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला शिरुर पोलिसांनी गुनाट गावातून अटक केली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Namdeo Kumbhar

Pune Swargate Shiv Shahi Case Dattatray Gade Arrested : पुण्यातील स्वारगेट डेपोमधील शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिरुर पोलिसांनी गुनाट गावातून दत्ता गाडे याला मध्यरात्री अटक केली. त्याला लष्कर पोलिसांत नेहण्यात आले. त्याची वैदकीय तपासणी झाली आहे. आज दुपारी दत्ता गाडे याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (Swargate Shiv Shahi Rape Case: Dattatray Gade Arrested in Shirur's Gunat Village)

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्काराचे कृत्य केल्यानंतर दत्ता गाडे शिरुरच्या गुनाट गावात आला होता. दिवसभर घरात आणि रात्री ऊसाच्या शेतात त्यानं वास्तव्य केलं. यावेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलीसांसह ग्रामस्थांनी रेस्क्यू केलं. दत्ता गाडे याला शोधण्यासाठी पोलिसांचे १३ पथके रात्रभर शोध घेत होते. ड्रोनचीही पोलिसांनी मदत घेतली. अखेर रात्री ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर दत्ता गाडे याने पोलीसांसमोर सरेंडर केलं. पुणे पोलीसांनी दत्ता गाडे याला शिरुर च्या गुणाट गावातून ताब्यात घेतलं.

दत्ता गाडे याच्या अटकेचा थरार -

दत्ता गाडे याने आपला मोबाईल बंद केला होता. पोलिसांनी त्याचा फोन स्ट्रेस करत शेवटचे लोकेशन शोधलं, त्यानंतर १३ पथके रवाना झाली होती. श्वानपथक, ड्रोन अन् गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी गुणाट गावात दत्ता गाडेचा शोध घेतला.

आरोपी दत्तात्रय गाडे गुणाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

गुरुवारी दिवसभर पोलिसांनी गुणाट गावात ड्रोनच्या मदतीने दत्ता गाडे याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही.

गुरुवारी रात्री ११.४५ वाजता दत्ता गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता.

दत्ता गाडे ज्या घरी पाणी पिण्यासाठी गेला होता, त्या महिलेने फोन करून पोलिसांना माहिती दिली.

दत्ता गाडे हा कॅनॉल आणि उसाच्या शेतात लपून बसत होता, त्याने रात्री दीड वाजता पोलिसांना सरेंडर केले. त्यानंतर त्याला लष्कर पोलिसांत नेहण्यात आलेय. त्याची वैदकीय तपासणी करण्यात आली आहे. आज त्याला दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

अटक कशी झाली? गावकऱ्यांनी काय केलं?

शिरुरच्या गुनाट गावातील दत्ता गाडेने पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कारचे कृत्याने गावची बदनामी होत असल्याने ग्रामस्थांनी आरोपीसोबत संवाद साधला अन् त्याला शरण येण्याची विनंती केली. गावकऱ्यांच्या विनंतीनंतर दत्ता गाडे हा मध्यरात्री पोलीसांसमोर शरण आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

Maharashtra Live News Update: शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी एक लाख 11 हजार रुपयांची मदत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

SCROLL FOR NEXT