Kalyan Dombivli Dangerous Buildings Saam tv
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवलीत वर्दळीच्या ठिकाणी धोकादायक इमारती; हजारो नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासन कधी कारवाई करणार?

Kalyan Dombivli Dangerous Buildings: कल्याण-डोंबिवलीत वर्दळीच्या ठिकाणी धोकादायक इमारती असल्याचे समोर आलं आहे. यामुळे हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

Vishal Gangurde

कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतीने नागरिकांचा जीव धोक्यात

प्रशासनाकडून केवळ नोटीस बजावल्या जाताहेत

प्रशासन कारवाई कधी करणार? नागरिकांचा सवाल

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

kalyan news : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती रहिवाशांच्या जीविताला धोकादायक बनल्या आहेत.पालिका प्रशासन केवळ धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्याचे काम करून आपले हात झटकत असल्याने आजही धोकादायक इमारतीचा प्रश्न आ वासून उभा राहिला असल्याने पालिका प्रशासन इमारती कोसळून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे साडेपाचशे हून अधिक इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती जीर्ण मरणासन्न अवस्थेत उभ्या आहेत. पावसाळा तोंडावर आला की पालिका प्रशासन पालिका क्षेत्रातील दहा प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर करून त्यांना नोटीस बजावण्याचे काम नित्य नियमाने दरवर्षी करत असते. नोटीस बजावण्या पलीकडे पालिका प्रशासन कोणतेच काम करीत नसल्याने या जुन्या इमारतीचे मालक इमारत कोसळण्याची वाट पाहत असतात.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील गोपाल नगर २ मधील आधार इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घराचा स्लॅब तळ मजल्यावरील घरावर कोसळला होता. यात तीन जण जखमी झाले होते. डोंबिवली कल्याणात आजही तीस ते चाळीस वर्ष जुन्या झालेल्या इमारती धोकादायक अवस्थेत मरणासन्न उभ्या आहेत. या इमारती कोसळण्याच्या स्थितीत उभ्या आहेत. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरातील, वाहतूक पोलीस ऑफिस समोरील, जुने लक्ष्मी हॉस्पिटल असलेली सुमती निवास ही दोन मजली इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीतील रहिवाशांच्या खोल्या रिकाम्या करण्यात आल्या होत्या .

गेल्या काही वर्षांपासून या रिकाम्या असलेल्या धोकादायक इमारतीला पालिका प्रशासन नोटीस पाठवण्यापलीकडे कोणतीच इमारत निष्कासित करण्याची कारवाई नाही, तर इमारत मालकाला काही पडली नाही. या धोकादायक इमारतीचा वापर रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांचे साहित्य ठेवण्याचा उपयोगाची राहिली आहे. तर या धोकादायक काही दुकानेही सुरू आहेत.

धोकादायक इमारत भर रस्त्याच्या कडेला उभी असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाण्याची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासन धोकादायक इमारत कोसळण्याची वाट पाहत आहे का, की पालिका प्रशासन कोणाच्या दबावामुळे या इमारतीवर निष्कासनाची कारवाई करत नाही, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT