Metro 9 saam tv
मुंबई/पुणे

Metro New Line: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला होणार सर्वाधिक फायदा?

Dahisar to Bhayndar Metro 9: दहिसर ते भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो सुरु करण्याचे नियोजन आहे.

Siddhi Hande

दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो लवकरच सुरु होणार

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण

डिसेंबरअखेरीस पहिला टप्पा सुरु होणार

संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे वेगाने परसत आहे. आता दहिसर ते भाईंदर या मेट्रोचही काम वेगाने सुरु आहे. लवकरच ही मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. दरम्यान, दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ चा पहिला टप्पा डिसेंबर महिन्याअखेरीस दाखल केला जाणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नियोजन सुरु केले आहे.

दहिसर-भाईंदर (Dahisar-Bhayander Metro) मेट्रोसाठी इंडिपेंडन्ट सेफ्टी असेसमेंट (ISA) प्राप्त झाले आहे. आता सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा पथकाला बोलावले जाणार आहे. या पथकाडून चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल. यानंतर दहिसर ते काशीगाव मार्गिका सुरु करण्याचा मार्ग मोकळा होईल.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रोचा पहिला टप्पा सुरु केला जाण्याची शक्यता आहे. दहीसर ते मिरा रोडमधील अंतर कमी करण्यासाठी ही मेट्रो सेवा सुरु केली जाणार आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा मेट्रो मार्ग १३.५ किमी लांब असणार आगे.

मेट्रो ९ ही मार्गिका दहिसर ते अंधेरी मेट्रो २ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार असणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरे थेट मीरा भाईंदरशी जोडली जाणार आहे.

स्थानके आणि खर्च

मेट्रो ९ च्या मार्गिकेत एकूण १० स्थानके असणार आहेत. या मेट्रोच्या कामासाठी ६६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव ४.५ किमी असणार आहे. या मार्गावर सुरक्षा चाचण्या घेतल्या जाणार आहेत. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो प्रवाशांसाठी सुरु करण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारताची मान जगात उंचावली! वैभव जैन यांनी 'The Button' मधून दिला भविष्याचा मंत्र, AI चांगलं की वाईट जगाला सांगितलं

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

Kitchen Hacks : आज काय बनवायचं? हा प्रश्न आता कायमचा बंद, 'हा' घ्या तुमच्या महिन्याभराचा मेनू प्लॅन

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला

Dating App: भयान वास्तव! डेटिंग अ‍ॅपवरचे ६५ टक्के युजर्स विवाहित अन् कमिटेड

SCROLL FOR NEXT