Massive blaze engulfs Megha Party Hall in Dahisar West; firefighters work tirelessly to douse flames. saamtv
मुंबई/पुणे

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Dahisar Fire: आगीत संपूर्ण पार्टी हॉल जळून खाक झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

Bharat Jadhav

दहिसर पश्चिम येथील मेघा पार्टी हॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण पार्टी हॉल जळून खाक झाला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. रात्रीच्या सुमारास हॉलसमोर रिव्हर फेस्टिव्हल सुरू असल्याने परिसरात हजारोंची गर्दी होती. दरम्यान पार्टी हॉलमध्ये आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये.

कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली होती. येथे आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांनी आग लागलेली पूर्ण बिल्डिंग केली रिकामी केली.

जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग

आज सकाळी मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. जोगेश्वरीतील जेएनएस बिझनेस सेंटर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सगळीकडे धुराचे लोट पसरे असून आग वाढतच चालली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील बेह्रमपाडा परिसरातील जे.एन.एस. बिझनेस सेंटर या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT