Gautami Patil News Saam TV
मुंबई/पुणे

Gautami Patil News: कातील अदांनी गाजवला दहीहंडी उत्सव! पहिल्याच मुंबई भेटीत गौतमीने मांडला सुरक्षेचा मुद्दा; नेमकं काय म्हणाली?

Dahi Handi Festival 2023: राज्यभरात ठिकठिकाणी भव्य दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून बक्षिसांची लयलुट पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

सचिन गडदे, प्रतिनिधी....

Gautami Patil Mumbai Show: आज राज्यभर दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी भव्य दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून बक्षिसांची लयलुट पाहायला मिळत आहे. याच कार्यक्रमानिमित्त सबसे कातील गौतमी पाटील पहिल्यांदाच मुंबईकरांच्या भेटीला आली. यावेळी गौतमीच्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या (Mumbai) मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी (Dahi Handi 2023) उत्सवाला लोकप्रिय लावणी कलावंत गौतमी पाटीलने (Lavani Dancer Gautami patil) हजेरी लावली होती. कार्यक्रमात सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…, या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स करत मुंबईकरांची मने जिंकली.

पहिल्यांदाच गौतमी मुंबईत...

दरम्यान, गौतमी पाटीलची राज्यभर प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. मात्र तिचे जास्तीत जास्त कार्यक्रम हे पुण्यात होतात. त्यामुळे मुंबईत गौतमीची ही पहिलीच भेट होती. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने मुंबईकरांचे आजचं प्रेम बघून मी भारावून गेली, असल्याचे सांगितले.

"मी जास्त कार्यक्रम पुण्यात (Pune) करते. आज मुंबईत कार्यक्रम करून छान वाटत आहे. कार्यक्रमासाठी मी बऱ्याच ठिकाणी जाते. सगळीकडे जसा प्रतिसाद असतो, तसाच इथेही प्रतिसाद मिळाला. मुंबईत सुरक्षित वाटलं, इतर ठिकाणीही मी सुरक्षित आहे. पणमुंबईकरांचे आजचं प्रेम बघून मी भारावून गेली.." असे गौतमी पाटील यावेळी म्हणाली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT