Maratha Reservation: दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ... बीडमधील मराठा आंदोलकांचा सरकारला अल्टीमेटम

Beed News: मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून नागपूर वान धरणावर धरणे आंदोलन सुरु आहे.
 Maratha Reservation Protest Beed
Maratha Reservation Protest Beed Saamtv
Published On

Maratha Reservation Protest Beed News: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या परळीमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला असून दोन दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ... असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

 Maratha Reservation Protest Beed
Weather Updates: महाराष्ट्रात पावसाचं कमबॅक, अनेक जिल्ह्यांमध्ये बरसल्या सरी; आज कुठे कोसळणार पाऊस?

याबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात (Jalna) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी व कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या ९ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. मराठा आरक्षणासाठी बीडमध्येही मराठा समाज आक्रमक झाला असून नागपूर वान धरणावर धरणे आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनात शेकडो मराठा बांधव धरणावरती धरणे आंदोलनाला बसले आहेत. आरक्षणाची मागणी करत धरणात उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या दोघा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 Maratha Reservation Protest Beed
Pankaja Munde On CM Shinde: कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही; पंकजा मुंडेंचा CM शिंदेना टोला

सरकारला अल्टिमेटम...

दोन दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा सामूहिक जल समाधी घेऊ. असा अल्टीमेटम परळीच्या मराठा समाजाने सरकारला दिला आहे. तसेच जरांगे पाटलाच्या जीवाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल, त्यामुळे तात्काळ मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्या अशी मागणीही या आंदोलकांनी केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com